Police Bharti Update 2025

Police Bharti Update: लागा तयारीला महाराष्ट्रात पंधरा हजार पोलीस भरतीचा मंत्रिमंडळात निर्णय

Maharashtra Police Bharti Big Update: महाराष्ट्र मंत्रिमंडळाने १२ ऑगस्ट २०२५ रोजी झालेल्या बैठकीत राज्यातील पोलिस विभागात १५,००० नवीन पदांसाठी भरतीस मंजुरी दिली आहे. ही भरती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या १५० दिवसांच्या सुधारणा कार्यक्रमाचा भाग आहे. या कार्यक्रमांतर्गत खालील बाबींवर भर दिला जाणार आहे:


  • पोलिस विभागाची पुनर्रचना
  • नियमांचे अद्ययावतकरण
  • अनुकंपा भरती
  • रिक्त पदांची ओळख व भरती प्रक्रिया

Maharashtra Police Bharti Update 2025

मुख्यमंत्री फडणवीस यांनी यापूर्वीच विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात ही भरती जाहीर केली होती. २०२२ ते २०२५ दरम्यान राज्य सरकारने ३८,८०२ पोलिसांची भरती केली असून, आणखी १३,५६० पदांसाठी प्रस्ताव सादर करण्यात आला आहे.


भरती प्रक्रियेबाबत महत्त्वाची माहिती

  • भरती प्रक्रिया पूर्वी काही महिन्यांपासून रखडली होती, त्यामुळे अनेक उमेदवार चिंतेत होते. आता मंत्रिमंडळाच्या मंजुरीनंतर प्रक्रिया वेगाने सुरू होण्याची शक्यता आहे.
  • शारीरिक चाचणी, लेखी परीक्षा आणि मुलाखत अशा तीन टप्प्यांत ही भरती होणार आहे.
  • अधिकृत जाहिरात लवकरच महाराष्ट्र पोलिस विभागाच्या mahapolice.gov.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध होण्याची शक्यता आहे.
  • इच्छुक उमेदवारांनी आवश्यक कागदपत्रे, पात्रता निकष आणि अर्ज प्रक्रिया काळजीपूर्वक तपासून तयारी सुरू करावी.
रोज नवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आपला  WhatsApp Group  जॉइन करा  – येथे क्लिक करा



मित्रांना शेअर करा:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top