MPSC Bharti 2023: महाराष्ट्र लोकसेवा आयोगा (MPSC) मार्फत रिक्त जागांसाठी भरती निघाली आहे. यांच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात आलेल्या जाहिरातीमध्ये पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवाराकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवले जाणार आहेत. जाहिरातीमधील रिक्त असणारी पदे, त्याबद्दलची इतर आवश्यक माहिती, पदानुसार असणारी अर्जाची शेवटची तारीख, या संबंधित सर्व मजकूर खाली देण्यात आलेला आहे. कृपया तो वाचावा.
MPSC Bharti 2023
एकूण जागा : 147 जागा
पदाचे नाव : सहायक कक्ष अधिकारी मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा – २०२३
शैक्षणिक पात्रता (Education Qualification) :
- फक्त मंत्रालयीन प्रशासकीय विभागाच्या खुद्द आस्थापनेवरील कार्यरत लिपिक, लिपिक-टंकलेखक व टंकलेखक संवर्गातील कर्मचारी प्रस्तुत परीक्षेस अर्ज करण्यासाठी पात्र आहेत. मंत्रालयीन प्रशासकीय विभागाच्या अधिपत्याखालील कोणत्याही दुय्यम कार्यालयातील कर्मचारी प्रस्तुत परीक्षेकरीता अर्ज करण्यास पात्र नाहीत.
जाहिरातीस अनुसरून निश्चित करण्यात आलेल्या अर्ज स्वीकारण्याच्या अंतिम दिनांकास लिपिक, लिपिक-टंकलेखक व टंकलेखक संवर्गामध्ये नियमित सेवेची किमान पाच वर्षे सेवा पूर्ण झालेले कर्मचारी प्रस्तुत परीक्षेकरीता अर्ज करण्यास पात्र आहेत. - कोणत्याही परिस्थितीत लिपिक, लिपिक-टंकलेखक अथवा टंकलेखक संवर्गातील पदावरील अभावित नियुक्तीचा कालावधी पात्रतेसाठी गणण्यात येणार नाही.
- लिपिकवर्गीय कर्मचा-यांसाठी असलेली सेवाप्रवेशोत्तर प्रशिक्षण परीक्षा उत्तीर्ण न झालेले अथवा सदर परीक्षा उत्तीर्ण होण्यापासून सूट दिलेली नाही, तसेच स्थायित्व प्रमाणपत्र प्राप्त केलेले नाही असे कर्मचारी प्रस्तुत परीक्षेच्या प्रवेशासाठी पात्र असणार नाहीत.
अर्ज फी (Application Fee) :
- अराखीव (खुला) – रु. ७१९/-
- मागासवर्गीय / आर्थिक दुर्बल घटक/ अनाथ/ दिव्यांग – रु.४४९/-
एवढा मिळेल पगार (Salary) : रुपये 38,600 – 1,22,800 अधिक नियमानुसार देय इतर भत्ते.
नोकरी ठिकाण (Job Location) : महाराष्ट्र
अर्ज पद्धती : ऑनलाईन
अर्ज सुरु होण्याची तारीख : 19 जुन 2023
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 10 जुलै 2023
परीक्षा पद्धत :-
- परीक्षेचे टप्पे :- एक – लेखी परीक्षा
- परीक्षेचे स्वरुप :- वस्तुनिष्ठ बहुपर्यायी
- प्रश्नपत्रिका :- दोन
- एकूण गुण :- २००
- लेखी परीक्षेची परीक्षा योजना व सविस्तर अभ्यासक्रम आयोगाच्या संकेतस्थळावरील ‘ उमेदवारांना सूचना ‘ अंतर्गत केल्याप्रमाणे राहील.
- लेखी परीक्षेतील एकूण गुणांच्या आधारे गुणवत्तेनुसार अंतिम निवड करण्यात येईल.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
मूळ जाहिरात ( Notification) | येथे क्लिक करा |
ऑनलाईन अर्ज करा (Apply Online) अर्ज सुरु 19 जुन 2023 पासून | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट (Official Website) | येथे क्लिक करा |
रोज नवीन Job WhatsApp वर मिळवण्यासाठी – येथे क्लिक करा