Maharashra Police Bharti Big Update: सन २०१९ पोलीस शिपाई (चालक) भरतीमध्ये उमेदवारांनी एका पेक्षा जास्त अर्ज केलेल्या उमेदवारांचे अर्ज रद्द करण्यात आले आहेत.
Maharashra Police Bharti Big Update
सन २०१९ पोलीस शिपाई (चालक) भरतीमध्ये एकापेक्षा जास्त आवेदन अर्ज सादर केलेल्या उमेदवारांची निवड रद्द केल्याप्रकरणी मा. महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण मुंबई यांनी त्यांचेकडील संदर्भ क्रमांक १ मधील दिनांक १९.०४ २०२२ अन्वये दिलेल्या न्यायनिर्णयानुसार केलेल्या कार्यामध्ये एकापेक्षा जास्त आवेदन अर्ज केलेल्या उमेदवारांच्या समावेशनानंतर ज्या उमेदवारांनी जाहिरातीत नमूद केल्यानुसार पोलीस शिपाई चालक पदासाठी एकच आवेदन अर्ज सादर केलेला आहे अशा उमेदवारांची सेवा समाप्त करण्यात आली.
अशा बाधित उमेदवारांनी मा. महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण मुंबई येथे दाखल केलेल्या मुळ अर्जामध्ये मा.न्यायाधिकरणाने संदर्भ क्रमांक ४ मधील दिनांक १७.०३.२०२३ च्या न्यायनिर्णयान्वये प्रस्तुत प्रकरणातील मा.महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण मुंबई यांचेकडील यापुर्वीचा दिनांक ११.०४. २०२२ चा न्यायनिर्णय रद्दाबाबत केला असून, सन २०१९ पोलीस शिपाई चालक पदाकरीता दिनांक ३०.११.२०१९ रोजी दिलेली जाहिरात ग्राह्य धरली आहे. तसेच एकापेक्षा जास्त घटकांत आवेदन अर्ज करून निवड झालेल्या उमेदवारांची उमेदवारी रद्द केली आहे. २. त्याचप्रमाणे मा.न्यायाधिकरणाचे संदर्भ क्रमांक १ मधील दिनांक ११.०४.२०२२ च्या न्यायनिर्णयाच्या अनुषंगाने या कार्यालयाचे दिनांक ०६.०५ २०२२ व दिनांक २२.०७.२०२२ अन्वये निर्गमित केलेली दोन्ही परिपत्रके रद्द करून सुधारीत निवड यादी करण्याबाबत मा.न्यायाधिकरणाने त्यांचेकडील संदर्भ क्र. ४ मधील दिनांक १७.०३.२०२३ च्या न्यायनिर्णयान्वये आदेश दिलेले आहेत.
पोलीस शिपाई (चालक) भरती GR पाहण्यासाठी येथे क्लिक करा