Good News!! Police Bharti Update

Good News!! Police Bharti Update | वय वाढवून मिळणार

Good News Police Bharti Update: आनंदाची बातमी!! कोरोनाच्या पार्श्वभूमीवर भरतीची जाहिराती प्रसिद्ध झाल्या नसल्याने, या कालावधीत काही उमेदवारांची कमाल वयोमर्यादा ओलांडली गेली असल्याने, त्यांची परीक्षेस बसण्याची संधी हुकली आहे, अशा उमेदवारांना स्पर्धा परीक्षांना बसण्यासाठी संधी उपलब्ध करुन देण्यात आली आहे. हा नवीन GR जाहीर झाला आहे. या GR मध्ये वय वाढवून मिळणार आहे. त्यानुसार अशी संधी उपलब्ध करुन देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.


Maharashtra Police Bharti 2022

महाराष्ट्र पोलीस अधिनियम

क्रमांक पोलीस-११२२/प्र.क्र.२२ /पोल-५ अ. महाराष्ट्र पोलीस अधिनियम (१९५१ चा २२) याच्या कलम ५ (ब) द्वारे प्रदान केलेल्या अधिकारांचा, आणि त्याबाबतीत त्यास समर्थ करणाऱ्या इतर सर्व अधिकारांचा वापर करून, महाराष्ट्र शासन, याद्वारे, महाराष्ट्र पोलीस शिपाई (सेवाप्रवेश) नियम, २०११ यात आणखी सुधारणा करण्यासाठी पुढील नियम करीत आहे :

१. या नियमांस, महाराष्ट्र पोलीस शिपाई (सेवाप्रवेश) (तिसरी सुधारणा) नियम, २०२२, असे म्हणावे.

२. महाराष्ट्र पोलीस शिपाई (सेवाप्रवेश) नियम, २०११ याच्या नियम ३ मध्ये, पोट-नियम (१) मधील खंड (अ) मध्ये, पुढील परंतुक जादा दाखल करण्यात येईल :

परंतु कोविड-१९ सार्वत्रिक साथरोगामुळे, १ जानेवारी, २०२० ते ३१ डिसेंबर २०२२ या कालावधीमध्ये ज्या उमेदवारांनी कमाल वयोमर्यादा ओलांडली आहे असे सर्व प्रवार्गाचे उमेदवार निवडीद्वारे उक्त पदांसाठी सन २०२० व २०२१ या कॅलेंडर वर्षांतील रिक्त पदे भरण्यासाठी घेण्यात यावयाच्या भरती प्रक्रियेसाठी एक वेळची उपाययोजना म्हणून, पात्र असतील.



वयोमर्यादा | Maharashtra Police Bharti age Limit :

Category (प्रवर्ग) Age (वय) वाढवून मिळालेले  वय
खुला 18 ते 28 18 ते 30
मागास 18 ते 33 18 ते 35
प्रकल्पग्रस्थ उमेदवार 18 ते 45 18 ते 47
माजी सैनिक उमेदवाराच्या सशस्त्र दलात झालेल्या सेवेइतका कालावधी अधिक 3 वर्षे इतकी सूट राहील. 5
अनाथ उमेदवार 18 ते 33 18 ते 35
भूकंपग्रस्थ उमेदवार 18 ते 45 18 ते 47
खेळाडू 18 ते 38 18 ते 40
पोलीस पाल्य 18 ते 33 18 ते 35
गृहरक्षक 18 ते 33 18 ते 35
महिला आरक्षणाचा लाभ घेणारे उमेदवार 18 ते 33 18 ते 35



GR पाहण्यासाठी

image

येथे क्लिक करा 




नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी सोशल मीडिया ग्रुप जॉईन करा

Join whatsapp group – Click Here

JOIN TELEGRAM PAGE  –   Click Here

मित्रांना शेअर करा:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top