मराठी न्यूज

CET वेळापत्रक जाहीर ! सीईटी परीक्षा होणार ऑगस्टमध्ये | CET schedule announced

 येत्या शैक्षणिक वर्षातील विविध अभ्यासक्रमांच्या पदवी व पदव्युत्तर परीक्षांसाठी नोंदणी प्रक्रिया सीईटी सेलमार्फत करण्यात आली आहे. राज्यातील विद्यापीठांच्या परीक्षा या १ ते १५ जुलैदरम्यान होण्याचे अपेक्षित असताना विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक हिताच्या दृष्टीने सीईटी परीक्षांच्या वेळापत्रकात पुन्हा बदल करण्यात आला आहे. या परीक्षांचे सुधारित वेळापत्रक जाहीर केल्याची माहिती सीईटी सेल आयुक्त रवींद्र जगताप यांनी दिली. त्यामुळे आता (MHT CET) एमएचटी सीईटीसह इतर अभ्यासक्रमांच्या ही आता ऑगस्ट महिन्यात होणार आहेत.

उच्चशिक्षण विभागाचे विविध पदवी व पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमांच्या सीईटी परीक्षा ०२ ते २५ ऑगस्ट दरम्यान होणार आहेत तर तंत्रशिक्षणांतर्गत विविध पदवी व पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमांच्या सीईटी परीक्षा ०२ ते २५ ऑगस्टदरम्यान होणार आहेत. एमएचटी-सीईटी २०२२ ही प्रवेश परीक्षा ०५ ते २० ऑगस्ट या कालावधीत घेण्यात येणार आहे घेण्यात येणाऱ्या सीईटी परीक्षा १२ तसेच कला शिक्षण विभागांतर्गत जूनला घेण्यात येणार आहे.

विभागवार संभाव्य तारखा


कलाशिक्षण  : 
दृश्यकला पदवी व डिझाईन – १२ जून

वैद्यकीय :

भौतिकोप्चार  – ११ सप्टेंबर
व्यवसायोपचार – ११ सप्टेंबर

स्पीच लँग्वेज पॅथॉलॉजी प्रोस्थेटिक्स अँड ऑर्थोटिक्स – ११ सप्टेंबर


तंत्रशिक्षण : 

पीसीएम ग्रुप  –  ५ ते ११ ऑगस्ट

पीसीबी ग्रुप – १२ ते २० ऑगस्ट

एमबीए / एमएमएस – २३ ते २५ ऑगस्ट

एमसीए – ४.५ ऑगस्ट

बी एचएमसीटी  – २१ ऑगस्ट

एम एचएमसीटी – २ ऑगस्ट

एम आर्च – २ ऑगस्ट

बी प्लॅनिंग – ४ ऑगस्ट

उच्चशिक्षण :

बीए- बी.एड्. – ४ ऑगस्ट

बीपीएड – २ ऑगस्ट

विधी ३ वर्षे – ३.४ ऑगस्ट

बी.एड. – २१.२२ ऑगस्ट

बी.एड्- एमएड्  (एकात्मिक)  – २ ऑगस्ट

एमएड़ – २ ऑगस्ट

एमपीएड् – २१ ऑगस्ट

विधी ५ वर्षे – २ ऑगस्ट

अधिकृत वेबसाईट : http://cetcell.mahacet.org/

 

नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी सोशल मीडिया ग्रुप जॉईन करा👇

👉Join whatsapp group – Click her

👉JOIN TELEGRAM PAGE  –   Click Here


मित्रांना शेअर करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!