जिल्हा परिषदेतील 2400 पदे लवकरच सरळसेवा भरतीने भरणार | Zilla Parishad Bharti 2022

जिल्हा परिषदेतील ‘क’ व ‘ड’ वर्गातील पदांचे आऊटसोर्सिंग करण्याचा निर्णय मागे घेण्यात येत आहे. ‘क’ वर्गातील  २३२८ व ‘ड’ वर्गातील १०० अशी २४२८ पदे जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली असलेल्या समितीमार्फत भरण्यात येतील, असे मुश्रीफ यांनी सांगितले.

Zilla Parishad Bharti 2022

क’ व ‘ड’ वर्गातील पदे
‘क’वर्गामध्ये कनिष्ठ अभियंता, कंत्राटी ग्रामसेवक, औषध निर्माता, आरोग्य सेवक, विस्तार अधिकारी, स्थापत्य अभियांत्रिकी सहायक, पशुधन पर्यवेक्षक, अंगणवाडी पर्यवेक्षिका, कनिष्ठ यांत्रिकी यांचा तर ‘ड’ वर्गात शिपाई पदाचा समावेश आहे.
जिल्हा परिषदेतील ‘क’ व ‘ड’ | वर्गातील कर्मचाऱ्यांची पदे जिल्हा परिषदेच्या वतीने सरळ सेवेने भरण्यात येतील, अशी घोषणा ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी सोमवारी केली. अनुकंपा तत्त्वावरील जिल्हा परिषदेतील ६२ कर्मचाऱ्यांना नियुक्ती आदेश प्रदान कार्यक्रम सोमवारी जिल्हा परिषदेच्या राजर्षी छत्रपती शाहू सभागृहात मुश्रीफ यांच्या हस्ते झाला. यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी पालकमंत्री सतेज पाटील होते.
‘ड’ वर्गातील पदे कंत्राटी पद्धतीने बाह्यसंस्थेकडून (आऊटसोर्सिंग) | भरण्याचा निर्णय काही दिवसांपूर्वीच शासनाने घेतला होता. परंतु यापूर्वी ज्या कंपन्यांकडून ही पदे भरली जायची त्यामध्ये अनेक तक्रारी येत होत्या. घोटाळे होत होते. त्यामुळे जिज्ञा परिषदेतील ‘क’ व ‘ड’ वर्गातील पदांचे आऊटसोर्सिंग करण्याचा निर्णय मागे घेण्यात येत आहे. ‘क’ वर्गातील २३२८ व ‘ड’ वर्गातील १०० अशी २४२८ पदे जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली असलेल्या 

समितीमार्फत भरण्यात येतील, असे मुश्रीफ यांनी सांगितले. जिल्हा परिषदेची बदनामी होणार नाही, याची काळजी नियुक्ती आदेश मिळालेल्या कर्मचाऱ्यांनी घ्यावी. सध्या आहे त्या ठिकाणी तीन वर्षे काम करा. बदलीसाठी लगेच हेलपाटे मारू नका. गरीब, सर्वसामान्यांची कामे प्राधान्याने करा. टेबलाखालून काही करू नका, असा सल्लाही त्यांनी दिला. सरकारी नोकरी मिळणे सध्या खूप कठीण झाले आहे. 
अशा परिस्थितीत आई किंवा वडील यांच्या निधनामुळे आपणाला ही संधी मिळत आहे याची जाणीव ठेवावी. त्यांच्याकडे कधीही दुर्लक्ष करू नका, असे आवाहन पालकमंत्री सतेज पाटील यांनी केले.
स्वागत व प्रास्ताविक प्रशासक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण यांनी केले. आभार उपमुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा देसाई यांनी मानले. ‘क’ व ‘ड’ वर्गातील पदे

 

नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी सोशल मीडिया ग्रुप जॉईन करा👇

👉Join whatsapp group – Click her

👉JOIN TELEGRAM PAGE  –   Click Here



मित्रांना शेअर करा:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top