PMKISAN नोंदणीकृत शेतकऱ्यांची eKYC प्रोसेस आता फक्त CSC सेंटर मधूनच होणार ! PMKisan Aadhar and Biometric eKYC
PMKisan Aadhar and Biometric eKYC
प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचे वर्षाला सहा हजार रुपये ज्या ज्या शेतकऱ्यांना येतात त्या सर्व शेतकऱ्यांनी आपली Aadhar eKYC करावी लागणार आहे. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या नोंदणीकृत लाभार्थी शेतकऱ्यांसाठी eKYC अनिवार्य आहे, अशी नोटिफिकेशन प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या अधिकृत पोर्टलवर जारी केली आहे. सर्व PMKISAN लाभार्थ्यांसाठी eKYC ची अंतिम मुदत 31 मे 2022 पर्यंत वाढवण्यात आली आहे. बायोमेट्रिक प्रमाणीकरणासाठी जवळच्या CSC केंद्रांशी संपर्क करा.
पीएम किसान योजनेअंतर्गत मार्च 2022 नंतरचे हप्ते मिळवण्यासाठी लाभार्थ्यांना ई-केवायसी करणं अनिवार्य आहे. तसंच सीएससीवर ई-केवायसी करून घेण्यासाठी एका खातेदारासाठी प्रत्येकी 15 रुपये आकारले जातील, अशी माहिती केंद्र सरकारच्या सीएससी योजनेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय कुमार राकेश यांनी दिली आहे.
केंद्र सरकारने PMKISAN अंतर्गत रक्कम मिळविण्यासाठी शेतकऱ्यांना ई-केवायसी अनिवार्य केले आहे. मात्र, या घोषणेपासून पीएम किसान पोर्टलवरील ई केवायसीचा पर्यायही बंद करण्यात आला आहे. आता लाभार्थी शेतकऱ्यांना त्यांच्या जवळच्या CSC केंद्रावर जाऊन बायोमेट्रिक आधारित केवायसी करून घ्यावे लागेल.
यापूर्वी शेतकरी पीएम किसान पोर्टलद्वारे आधार कार्ड आधारित केवायसी घरी बसून करू शकत होते. यामध्ये तुमच्या आधार कार्ड नोंदणीकृत मोबाईल नंबरवर एक ओटीपी यायचा, ज्याच्या आधारे केवायसी पूर्ण झाले. मात्र आता ते अस्थाई रुपात बंद करण्यात आले आहे.