शरद पवार ग्राम समृद्धी योजना 2022 – sharad pawar gram samrudhi yojana 2022

 


राज्य सरकारकडून वेळोवेळी लोकहिताच्या विविध योजना सुरू केल्या जात असून 2022 पर्यंत शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचे सरकारचे ध्येय आहे. यासाठीही सरकारने शेतकऱ्यांच्या हिताच्या अनेक योजना सुरू केल्या आहेत. याचा फायदा राज्यातील नागरिकांना होऊन राज्यही आर्थिकदृष्ट्या प्रगत होण्याचा उद्देश आहे.

आज या लेखात आपण शरद पवार ग्राम समृद्धी योजनेबद्दल संबंधित सर्व माहिती जाणून घेणार आहोत जसे की, या योजनेची पात्रता, कागदपत्रे, योजनेचा उद्देश, लाभ, वैशिष्ट्ये, अर्ज प्रक्रिया इ. त्यामुळे संपूर्ण माहिती मिळवण्यासाठी हा पूर्ण लेख वाचा….


शरद पवार ग्राम समृद्धी योजना 2022 – sharad pawar gram samrudhi yojana 2022


या योजनेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष श्री शरद पवार जी यांचे नाव देण्यात आलं आहे. 12 डिसेंबरला शरद पवार यांचा वाढदिवस आहे, त्यामुळे याच दिवशी 12 डिसेंबर 2020 रोजी ही योजना सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला.


शरद पवार ग्रामीण समृद्धी योजनेंतर्गत गावांचा विकास होण्यासोबतच शेतकऱ्यांना प्रगत शेती करता यावी म्हणून त्यांच्या शेतीशी संबंधित कामांमध्ये सुविधा मिळणार आहे. या योजनेचं नाव महाविकास आघाडी सरकारने सुचवले होतं. या योजनेलाही मंत्रालयाने मान्यता दिली असून शरद पवार ग्रामीण समृद्धी योजना ही मनरेगाशी जोडली गेली आहे.


महाराष्ट्र शरद पवार ग्रामीण समृद्धी योजना महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेशी महाराष्ट्रात सुरू करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. ही योजना रोजगार हमी विभागामार्फत आली आहे. या योजनेमुळे ग्रामस्थ व शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती सुधारेल, त्यांना रोजगाराच्या होतील आणि गावांचाही विकास होईल यात शंका नाही.

पहा किती अन् कसा मिळणार निधी…


कुक्कुट पालन तसेच पोल्ट्री शेड बांधणे :

  • 100 पक्ष्यांकरिता शेड बांधण्यासाठी 49,760 रुपये अनुदान मिळणार तर 150 पेक्षा जास्त पक्षी असल्यास दुपट निधी मिळणार आहे. जर एखाद्या शेतकऱ्याकडे 100 पेक्षा कमी पक्षी असल्यास त्याने 100 रुपयांचा स्टॅम्प घेऊन दोन जामीनदारांच्या सहीसह अर्ज करता येऊ शकतो. परंतु शेड मंजूर झाल्यानंतर 100 पक्षी असणे बंधनकारक असणार आहे.


शेळ्यासाठी शेड बांधणे :

  • 10 शेळ्यांचे शेड बांधण्यासाठी 49,284 रुपये अनुदान दिलं जाणार असून 20 शेळ्यांसाठी दुप्पट, तर 30 शेळ्यांसाठी तिप्पट अनुदानाचा लाभ घेता येईल.


भू-संजीवनी नाडेप कोंपोस्टिंग :

  • शेतातील कचरा एकत्र करून नाडेप पद्धतीने कंपोस्ट खत तयार करण्यासाठी 10,537 रुपये अनुदान दिलं जाणार आहे.


गाई आणि म्हशींसाठी पक्का गोठा बांधणे :

  • या योजनेअंतर्गत 2 ते 6 गुरांसाठी (गाई/म्हैस) गोठा बांधण्यासाठी 77,188 रुपये इतके अनुदान मिळेल. तर 12 गुरांसाठी दुप्पट, 18 पेक्षा जास्त गुरांसाठी तिप्पट अनुदानाचा लाभ घेता येणार आहे.



महाराष्ट्र शरद पवार ग्रामीण समृद्धी योजना 2022 चे लाभ :

  • या योजनेंतर्गत खेड्यापाड्यातील व राज्यातील शेतकऱ्यांना लाभ मिळणार आहे. शरद पवार ग्रामीण समृद्धी योजनेतून शेतकरी व ग्रामस्थांना रोजगार उपलब्ध करून दिला जाणार आहे. या योजनेंतर्गत शेतकऱ्यांची शेती सुधारण्यासाठी उपाययोजना शिकवल्या जातील, ज्यामुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढेल.
  • या योजनेंतर्गत ग्रामीण भागात शेड व गोठा बांधण्यात येणार आहे.
  • राज्यातील ज्या नागरिकांना पोल्ट्री फार्म सुरू करायचा आहे, त्यांनाही सरकारकडून मदत दिली जाणार आहे. ज्या शेतकऱ्यांकडे फक्त 2 जनावरे पाळली आहेत त्यांनाही या योजनेचा लाभ घेता येईल.

शरद पवार ग्रामीण समृद्धी योजनेसाठी आवश्यक पात्रता आणि कागदपत्रे :

  • या योजनेसाठी अर्ज करणारी व्यक्ती महाराष्ट्राची कायमस्वरूपी रहिवासी असावी.
  • अर्जदार हा ग्रामीण भागात राहणारा असावा. शेती करणारी व्यक्ती या योजनेसाठी पात्र मानली जाईल.
  • अर्जदाराकडे त्याचे आधार कार्ड असणे आवश्यक आहे. अर्जदाराचे रेशनकार्डही असायला हवं, तरच तो अर्ज करू शकतो.
  • या योजनेचा लाभ मिळविण्यासाठी व्यक्तीकडे कायमस्वरूपी रहिवासी प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.
  • त्याच्याकडे उत्पन्नाचा दाखलाही असणे आवश्यक आहे.
  • याशिवाय अर्जदाराचा मोबाईल क्रमांक, पासपोर्ट आकाराचे छायाचित्र आणि मतदार ओळखपत्रही लागेल.



महाराष्ट्र शरद पवार ग्रामीण समृद्धी योजना 2022 साठी अर्ज प्रक्रिया :



  • सध्या या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला ऑनलाईन अर्ज करता येणार नाही, सरकारने अजून ऑनलाईन सेव उपलब्ध केली नसून तुम्हाला ऑफलाईन अर्ज केला येणार आहे.

  • तुम्हाला या योजनेसाठी ग्रामपंचायत कार्यालयात अर्ज करावा करावा लागणार आहे. त्या 4 पानांची संपूर्ण PDF तुम्ही या डाउनलोड करू शकता.


शरद पवार ग्राम समृद्धी योजना 2022  फॉर्म –  इथे क्लिक करा 


अर्ज कसा भरायचा ? 


प्रथमतः तुम्ही सरपंच, ग्रामसेवक किंवा ग्रामविकास अधिकाऱ्यांपैकी कोणाकडे अर्ज करताय त्याच्या नावावर बरोबरची खूण करा.

त्यानंतर खाली दिल्याप्रमाणे, ग्रामपंचायत नाव / तालुका, जिल्हयाचं नाव टाकून उजवीकडे तारीख टाकून फोटो चिकटवा.

अर्जदाराचे नाव,

पत्ता,

तालुका,

जिल्हा

मोबाईल क्रमांक टाका.

संपूर्ण डिटेल्स भरा.


  • येथे मनरेगा अंतर्गत दिल्या जाणाऱ्या कामांची यादी आहे. पण, आपल्याला शरद पवार ग्रामसमृद्धी योजनेसाठी अर्ज करायचा असल्याने नाडेप कंपोस्टिंग, गाय- म्हैस गोठ्यांचं कॉक्रिटीकरण, शेळी पालन शेड, कुक्कुटपालन शेड यापैकी तुम्हाला ज्या कामासाठी अनुदान हवे आहे त्या कामासमोर बरोबरची खूण करा.
  • इथे प्रत्येक कामासाठी तुम्हाला स्वतंत्र अर्ज करावा लागणार आहे.
  • त्यानंतर तुमचं कुटुंब कोणत्या प्रकारात (cast) मोडतं त्यासमोर बरोबरची खूण करा.
  • तुम्ही जो प्रकार निवडाल त्यासंबंधीचा कागदपत्राचा पुरावा जोड़ा.
  • लाभार्थीच्या नावे जमीन आहे का, असल्यास “हो’ म्हणून सातबारा, आठ-अ आणि ग्रामपंचायत नमुप्ता 9 जोडा.
  • रहिवासी दाखला जोडा तसेच तुम्ही निवडलेले काम तुम्ही रहिवासी असलेल्या ग्रामपंचायतीमध्ये येत आहे का, तेही भरा.
  • अर्जदाराच्या कुटुंबातील 18 वर्षांवरील पुरुष, स्त्री आणि एकूण सदस्यांची संख्या लिहा.
  • शेवटी घोषणापत्रावर नाव लिहून सही किंवा अंगठा करा.
  • यासोबत मनरेगाचे जॉब कार्ड, 8-अ, सात-बारा उतारे आणि ग्रामपंचायत मालमत्ता नमुना 8-अ चा उतारा जोडा.
  • यानंतर ग्रामसभेचा एक ठराव द्यायचा आहे. यासोबत सरपंच आणि ग्रामसेवकांच्या सहीचे एक शिफारसपत्र द्यावे लागणार आहे. यात लाभार्थी सदर कामाचा लाभ घेण्यासाठी पात्र असल्याबाबत सांगितले जाईल.
  • त्यानंतर तुमच्या कागदपत्रांची छाननी होईल आणि तुम्हाला पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांच्या सही शिक्क्यानुसार पोचपावती दिली जाईल. यात तुम्ही लाभासाठी पात्र आहे की नाही ते नमूद केले जाईल.
  • एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्ही मनरेगाचे लाभार्थी असाल तर तुम्हाला या योजनेचा लाभ घेता येईल; पण तुमच्याकडे मनरेगाचे जॉब कार्ड नसेल तर मात्र तुम्हाला आधी ग्रामपंचायत कार्यालयात जॉब कार्ड मिळवण्यासाठी अर्ज करावा लागणार आहे.



Join whatsapp group – Click her

JOIN TELEGRAM PAGE  –   Click Here

मित्रांना शेअर करा:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top