मुंबई : महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या उन्हाळी सत्र परीक्षा १९ मे पासून सुरू होणार आहेत. या परीक्षा दोन टप्प्यांत होणार असून, पहिला टप्पा हा पदव्युत्तर वैद्यकीय विद्याशाखांच्या पदवी व पदविका अभ्यासक्रमाचा आहे. यासंदर्भातील परीक्षांचे वेळापत्रक विद्यापीठाच्या ह अधिकृत संकेतस्थळावर जाहीर करण्यात आल्याची माहिती परीक्षा नियंत्रक डॉ. अजित पाठक यांनी दिली. हा
राज्यातील विविध परीक्षा केंद्रांवर उन्हाळी सत्र परीक्षेसाठी एकूण २२०० विद्यार्थी बसणार आहेत. दुसरा टप्पा हा पदव्युत्तर वैद्यकीय अभ्यासक्रम वगळता उर्वरित सर्व पदव्युत्तर आरोग्य | विज्ञान विद्याशाखेच्या वैद्यकीय, दंत, आयुर्वेदिक, युनानी, होमिओपॅथी, भौतिकोपचार, व्यवसायोपचार, भाषा श्रवणदोष, कृत्रिम अवयव विज्ञान, परिचर्या व सर्व आरोग्य विज्ञान विद्याशाखेच्या पदवीच्या सर्व वर्षांच्या लेखी परीक्षा या १ जुलैपासून सुरू होणार असून, ३१ ऑगस्टला संपणार आहेत. या परीक्षांसाठी एकूण ४५ हजार विद्यार्थी बसणार आहेत.
विद्यापीठाच्या हिवाळी सत्र २०२१ परीक्षेचे निकाल विद्यापीठाकडून १४ दिवसांच्या आत जाहीर करण्यात आले आहेत. सद्यस्थितीत सर्व आरोग्य विज्ञान विद्याशाखांचे पदवीच्या सर्व सत्रांच्या एकूण ७६ हजार ६६१ विद्यार्थ्याच्या परीक्षांच्या प्रात्यक्षिक व उत्तरपत्रिकांचे मूल्यमापन सुरू असल्याची माहिती आरोग्य विज्ञान |विद्यापीठ प्रशासनाकडून देण्यात आली. या परीक्षांचे निकाल में २०२२च्या अखेरीस जाहीर करण्याचे विद्यापीठाकडून प्रस्तावित आहे.
Join whatsapp group – Click her
JOIN TELEGRAM PAGE – Click Here