गुड न्यूज देशातील ७५ बँका २४ तास सुरू राहणार
डिजिटल बँकांसाठी आरबीआयकडून मार्गदर्शक सूचना
नवी दिल्ली : देशातील बँका दिवसभरात एका विशिष्ट वेळेतच सुरू असतात. मात्र लवकरच बँका आठवड्याचे सातही दिवस आणि २४ तास सुरू राहणार आहेत. त्यासाठी आरबीआयने पावले टाकण्यास सुरुवात केली आहे. केंद्रीय अर्थसंकल्पात बँकांच्या २४ तास आणि सातही दिवस कामाचा मुद्दा उपस्थित करण्यात आला होता. त्यानंतर आता आरबीआयकडून नवीन पावले उचलण्यात आली आहेत.
जनधन बँक खात्यानंतर आता देशातील ७५ जिल्ह्यांत ७५ डिजिटल बँक युनिट्स (डिबीयु) उघडण्यात येणार असून, यासाठी मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत. आरबीआयच्या या मार्गदर्शक सूचना सर्व व्यावसायिक बँकांना लागू होणार आहेत. यामध्ये ग्रामीण बैंक, पेमेंट्स बँक आणि स्थानिक बँकांचा समावेश करण्यात आलेला नाही.
सुरक्षेची पुरेशी काळजी रिझर्व्ह बँकेने डिजिटल बँकेत पुरेशी सुरक्षाव्यवस्था ठेवण्याचे आदेश दिले आहेत. याशिवाय ग्राहकांना ऑनलाईन गंडा बसू नये यासाठी पुरेशी सायबर सुरक्षा ठेवण्याचे निर्देश आरबीआयने | दिले आहेत. या सुरक्षेची सर्व जबाबदारी संबंधित बँकेची असेल.
स्वत:च उघडा बँक खाते
डिजिटल बँकेत ग्राहक स्वतःचे खाते स्वतः उघडू शकणार आहे. तसेच बँकेशी संबंधित सर्व कामे आता ग्राहकच करू शकणार आहेत. सेल्फ सर्व्हिससोबत या डिजिटल बँकेत बँकेचेही ग्राहक असतील.
ग्राहकांना एखादी गोष्ट कळली नाही. तर त्यांना समजावून सांगण्यासाठी आणि त्यांच्या अडचणी दूर करण्यासाठी बँकेचे कर्मचारी मदत करतील.
सर्वात मोठी बाब म्हणजे या डिजिटल बँका २४ तास खुल्या राहणार आहेत. त्यामुळे आपण आपल्या वेळेनुसार बँक सेवा वापरु शकतो.
डिजिटल बँकेत काय असेल?
आरबीआयच्या सूचनांनुसार, प्रत्येक बँकेला अत्याधुनिक उपकरणे बसवून – घ्यावी लागतील. यामध्ये एंटरअॅक्टिव्ह टेलर मशीन, एंटरअॅक्टिव्ह बँकर, सर्व्हिस टर्मिनल, टेलर, कॅश रिसायकल एटरअॅक्टिव्ह डिजिटल वॉच, डॉक्युमेट अपलोडिंग, सेल्फ सर्व्हिस कार्ड, व्हिडीओ केवायसी असेल.
ग्राहकाला काय सुविधा?
बचत खाते, चालू खाते. मुदत ठेव, ग्राहकांसाठी डिजिटल किट, मोबाइल बैंकिंग, इंटरनेट बँकिंग, डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, व्यापाऱ्यांसाठी डिजिटल किट, युपीआय क्यूआर कोडसह भीम आधार, कर्जासाठी अर्ज करणे यासह अनेक सुविधाचा समावेश आहे.