गुड न्यूज कॉलेजच्या परीक्षेसाठी १५ मिनिटांचा वाढीव वेळ मिळणार ; मुंबई विद्यापीठाकडून परिपत्रक जारी
लिखाणाचा सराव कमी झाल्याने मंत्र्यांचा निर्णय
मुंबई : कोरोना काळात शाळा आणि महाविद्यालये बंद ठेवल्याने या काळात | विद्यार्थ्यांचे वर्ग आणि परीक्षा या ऑनलाइन घेतल्या. दरम्यान, आता कोरोना परिस्थिती आटोक्यात येत असताना शाळांसह महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या परीक्षाही ऑफलाइन होणार आहेत. दरम्यान, कोरोना काळात विद्यार्थ्यांचा लिहिण्याचा सराव कमी झाल्याने ऑफलाइन पद्धतीने परीक्षा घेताना वेळ वाढवून देण्याची मागणी विद्यार्थ्यांकडून केली जात होती. पार्श्वभूमीवर या कुलगुरूसोवत झालेल्या ऑनलाइन बैठकीत उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी विद्यार्थ्यांना १५ मिनिटे वाढवून देण्याचा निर्णय घेतला.
विद्यार्थ्यांना ऑनलाइन अभ्यासाचा पर्याय उपलब्ध करून दिला होता. ऑनलाइन परीक्षा या एमसीक्यू पद्धतीने झाल्या त्यामुळे विद्याथ्र्यांना दीर्घ उत्तरे लिहिण्याचा सराव राहिला नाही. आता प्रत्यक्ष परीक्षा होत असल्याने विद्यार्थ्यांना पेपर लिहिण्याची भीती वाटत आहे. त्यातील अनेक विद्यार्थ्यांना लिखाणाचा सराव नसल्याने पेपर वेळेत पूर्ण होणार नाही, अशी भीती वाटत असल्याने परीक्षा ऑनलाइन घ्या किंवा वेळ वाढवून द्या. अशी मागणी होत होती. अनेक विद्यार्थ्यांनी विद्यार्थी संघटनांकडेही धाव घेतली.
या पार्श्वभूमीवर युवा सेनेकडून उच्च व तंत्रशिक्षण मंत्री सामंत यांच्याकडे विद्यर्थ्यांना वाढीव वेळ देण्याची मागणी करण्यात आली होती. ही मागणी मंत्र्यांकडून मान्य करण्यात ‘आली असून विद्यार्थ्यांना १५ मिनिटे वेळ वाढवून मिळणार आहे.
मुंबई विद्यापीठाकडून परिपत्रक जारी
उच्च व तंत्रशिक्षण मंत्र्यांनी जाहीर केलेल्या निर्णयाच्या अंमलबजावणीसाठी मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन विभागाकडून परिपत्रक जारी करण्यात आले आहे.
मुंबई विद्यापीठांतर्गत येणाऱ्या सर्व संस्था, महाविद्यालयाच्या ज्या परीक्षा ऑफलाइन पद्धतीने होणार आहेत त्यांच्यासाठी १५ मिनिटे इतका वाढीव वेळ लागू असेल.
दरम्यान, ही सुविधा फक्त उन्हाळी परीक्षेपुरतीच लागू राहणार असल्याचेही अधोरेखित करण्यात आले आहे.