मराठी न्यूज

गुड न्यूज कार्डाशिवाय पैसे काढता येणार, किती पैसे काढता येणार पहा

 घरातून बाहेर पडल्यानंतर अचानक पैसे काढायची वेळ आली आणि खिशात कार्ड नसेल तर होणाऱ्या वैतागातून आता लवकरच सुटका होणार आहे. कारण, देशभरातील एटीएममधून लवकरच कार्डाखेरीज पैसे काढण्याची सुविधा उपलब्ध होणार आहे. सध्या काही बँका आपल्या ठरावीक एटीएममधूनच ही सुविधा देत आहेत; पण या तंत्रज्ञानाचा आता देशपातळीवर विस्तार करण्याची घोषणा भारतीय रिझर्व्ह बँकेने केली आहे. हे तंत्रज्ञान कसे असेल आणि आपल्या कार्डाशिवाय कसे पैसे काढता येतील ते पाहू….

कार्डाशिवाय कसे काढायचे पैसे?

  • याकरिता ग्राहकाला बँकेचे अॅप डाऊनलोड करावे लागेल.
  • आपले बैंक खाते आणि मोबाईल नंबर सलग्न करून घ्यावा लागेल.
  • एटीएममध्ये गेल्यानंतर आपल्या अॅपमधून कार्डरहित पैसे काढण्याच्या पर्यायावर क्लिक करीत जितकी रक्कम काढायची आहे. ती तिथे भरावी लागेल.
  • यानंतर एक ओटीपी अर्थात वन टाईम पासवर्ड मोबाईलवर येईल. तो एटीएममधे टाकल्यानंतर आपल्याला रक्कम प्राप्त होईल.

याकरिता दुसरा पर्याय म्हणजे,


  • एटीएममध्ये कार्ड विरहित पर्यायावर क्लिक केल्यानंतर आपला बैंक खात्याशी संलग्न असलेला मोबाईल नंबर टाकायचा.
  • हा नंबर टाकल्यानंतर. एटीएमच्या स्क्रीनवर एक क्यूआर कोड दिसेल. तो आपल्या मोबाईलमधून कॅमेऱ्याच्या माध्यमातून रीड केल्यानंतर पुढील व्यवहार करणे शक्य होईल.

यातील तिसरा पर्याय म्हणजे, 

  • एटीएममध्ये कार्डरहित व्यवहारांचा पर्याय निवडायचा. तिथे मोबाईल नंबर टाकल्यानंतर येणारा ओटीपी एटीएममध्ये टाईप करायचा. मग जेवढी रक्कम काढायची आहे ती नमूद करायची. मग पैसे प्राप्त होतील.


किती पैसे काढता येतील?

  • सुरुवातीच्या टप्प्यात १० हजार ते २५ हजार रुपयाच्या दरम्यान पैसे काढण्याची मुभा मिळेल. टप्प्याटप्प्याने ही रक्कम वाढविली जाईल.

कार्डप्रणाली सुरुच राहणार

    • कार्ड विरहित प्रणाली कार्यान्वित होणार असली तरी, सध्या असलेली कार्डप्रणाली सुरुच राहणार आहे.
    • सध्या देशात ८५ कोटी डेबिट कार्डस आहेत, तर सहा कोटी २० लाख क्रेडिट कार्डस आहेत. हे कोणते तंत्रज्ञान आहे?
    • युनिफाईड पेमेट इंटरफेसच्या  माध्यमातून हे पैसे काढता येतील. सध्या याच तत्रज्ञानाच्या माध्यमातून मोबाईल ते मोबाईल पैसे पाठविता येतात.



     
    नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी 

    सोशल मीडिया ग्रुप जॉईन करा👇

    👉Join whatsapp group – Click her

    👉JOIN TELEGRAM PAGE  –   Click Her

    मित्रांना शेअर करा:

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    error: Content is protected !!