विधानसभेत महसूलमंत्री थोरात यांची घोषणा एकहजार तलाठ्यांची लवकरच भरती !
राज्यात तलाठ्यांच्या जागा मोठ्याप्रमाणात रिक्त असल्याने महसूल यंत्रणेवर पडणारा ताण लक्षात घेऊन 3,165 तलाठी पदे भरण्यासाठी मंत्रिमंडळाने मंजुरी दिली असून पहिल्या टप्प्यात एक हजार तलाठ्यांची भरती करण्यातये ईल, अशी माहिती महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी सोमवारी विधानसभेत दिली.
अड. अशोक पवार आणि भीमराव तापकीर यांनी पुणे जिल्ह्यातील हवेली तालुक्याचेविस्तारीकरण, नागरीकरण आणि विकास लक्षात घेता प्रशासकीय यंत्रणा तोकडी पडत असल्याची लक्षवेधी मांडली होती. हवेली तालुक्यात 160 गावांचा समावेश असून अंदाजे 40 लाख लोकसंख्येची वस्ती आहे.
वाढते शहरीकरण आणि वाढत्या प्रशासकीय कामकाजामुळे लोणी काळभोर येथे अपर तहसीलदार कार्यालय स्थापन करण्याच्या प्रस्तावावर शासन सकारात्मकनि र्णय घेईल अशी ग्वाही थोरात यांनी दिली. वाढती लोकसंख्या आणि शहरीकरणामुळे यापूर्वी पिंपरीझ चिंचवड येथे अपर तहसीलदार कार्यालय स्थापन करण्यास मान्यता देण्यात आली आहे. त्यानुसार मूळ हवेली कार्यालय आणि अपर तहसील कार्यालय पिंपरी-चिंचवड या कार्यालयांमार्फत सद्यःस्थितीत कामकाज सुरू आहे.
लोणी काळभोर येथे अपर तहसीलदार कार्यालय स्थापन करण्याच्या प्रस्तावावर तातडीने निर्णय घेण्यात येणार आहे. 160 गावांमध्ये 46 तलाठी कार्यरत आहेत. 3,165 तलाठी पदे भरण्यासाठी शासनाने मंजुरी दिली असून, याअंतर्गत संबंधित भागातील तलाठ्यांची रिक्त पदे तातडीने भरण्यात येतील असेही थोरात यांनी सांगितले.
नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9420062770 या क्रमांकावर Whatsapp करा
Join whatsapp group – Click her
JOIN TELEGRAM PAGE – Click Here