भरती बातमी

POLICE BHARTI BIG UPDATE | पोलीस दलातील 5,297 रिक्त पदांची भरती सुरू! गृहमंत्र्यांची माहीती ?

 Police Recruitment : पोलीस दलातील 5297 रिक्त पदांची भरती सुरु; गृहमंत्र्यांची माहिती काही दिवसात प्रक्रिया पूर्ण होईल आणि आणखी 7229 पोलीस भरती होईल. 

 पोलीस दलातील 5,297 रिक्त पदांच्या पोलीस भरती (Police Recruitment) प्रक्रिया सुरु आहे. काही दिवसात प्रक्रिया पूर्ण होईल आणि आणखी 7,229 पोलीस भरती होईल अशी माहिती गृहमंत्री दिलीप वळसे पाटील (Home Minister Dilip Walse Patil) यांनी विधानसभेत दिली.

तसंच होमगार्ड ही मोठी ताकद आहे, मात्र त्यांना दिवसभरकाम मिळत नाही. त्यांना काम देण्याच्या दृष्टीकोनातून अर्थ विभागाकडे प्रस्ताव दिला असून होमगार्डला वर्षभरातून किमान 120 ते 150 दिवस काम देण्यासंदर्भातील निर्णय दिला आहे. यात कोणताही गैरप्रकार होणार नाही काळजी घेणार असून पोलीस विभागात दाखल झालेला पोलीस शिपायाला निवृत्त होताना प्रत्येक हवालदार आणि शिपायी हा पोलीस उपनिरीक्षक झालेला असेल, असा निर्णय घेण्यात आला असल्याचही दिलीप वळसे पाटलांनी सांगितलं.

दरम्यान, राज्यातील पोलीस ठाण्यांच्या इमारती (Polices tation Buildings) जुन्या झाल्या आहेत. काही इमारती या ब्रिटीशकालीन आहेत. त्यात सुधारणा करण्याच्या दृष्टीकोणातून गृहनविभागाने निर्णय घेतला असून गेल्या वर्षी 87 पोलीस ठाण्यांची बांधकामं हाती घेतली आहेत. त्यासाठी निधी उपलब्ध करुन दिला आहे. तसेच, निवासासंबंधीही मोठी तरतूद केली | असल्याचं त्यांनी सांगितलं.

Join whatsapp group – Click her

JOIN TELEGRAM PAGE  –   Click Here

मित्रांना शेअर करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!