(PNB), पंजाब नॅशनल बँक सार्वजनिक क्षेत्रातील एक अग्रणी बँक, नाशिक मंडळा अंतर्गत सफाई कर्मचारी, शिपाई पदांच्या एकूण 48 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 मार्च 2022 आहे.
- पदाचे नाव – सफाई कर्मचारी, शिपाई
- पद संख्या – 48 जागा
पदाचे नाव& तपशील:
पद क्र. पदाचे नाव पद संख्या
१ शिपाई 14
२ सफाई कामगार 34
एकून ४८
शैक्षणिक पात्रता:
- पद क्र.1: (i) केवळ 12वी उत्तीर्ण (ii) इंग्रजी भाषेचे मुलभुत वाचन (औरंगाबाद, अहमदनगर व नाशिक जिल्ह्याचे रहिवासी यांच्या करिता)
- पद क्र.2: (i) 10वी उत्तीर्ण नसावे किंवा कोणतीही शैक्षणिक पात्रता नाही (ii) इंग्रजी भाषेचे मुलभुत वाचन (जे अहमदनगर, अकोला, औरंगाबाद, बुलढाणा, जळगाव, जालना, नांदेड, नाशिकचे रहिवासी आहेत. )
पद क्र. १ करिता कागदपत्रे
सोबत जोहावयाचे दस्तावेज : पुढील प्रमाणे प्रमाणीत / स्व-प्रमाणीत प्रती :
१. जिल्हा सैनिक कार्यालय (सेवानिवृत्त सैनिक असल्यास) / रोजगार कार्यालय नोंदणीकरण कार्ड, नोंदणीकृत असल्यास.
२. पासपोर्ट आकाराचे छायाचित्र, अर्जाच्या उजव्या बाजूस योग्यरित्या चिकटवण्यात यावे.
३. स्थानांतरण प्रमाणपत्र तसेच दहावी व बारावीची गुणपत्रिकेसहित शैक्षणिक पात्रतेची सूची.
४. जात प्रमाणपत्र तसेच नविनतम इमाव प्रमाणपत्र आर्थिक दुर्बल वर्गातील उमेदवारांसाठी नॉनक्रिमीलेअर रकान्यासहित.
५.. कायम निवासी प्रमाणपत्र व ओळख प्रमाणपत्र तसेच अन्य प्रासंगिक दस्तावेज.
६. सेवामुक्ती प्रमाणपत्र / सेवा पुस्तीका पीपीओ. ओळखपत्र व सेवानिवृत सैनिक असल्यास एलपीसी.
७. अधिवास प्रमाणपत्रांसाठी | मुळ निवासचे प्रमाण किंवा रोजगार कार्यालय पंजिकरण कार्ड.
८. आर्थिदृष्ट्या दुर्बल वर्मा अंतर्गत अर्ज केल्यास पुढील अधिकाऱ्यांद्वारे जारी उत्पन्न व संपत्ती प्रमाणपत्र जिल्हाधिकारी / अप्पर जिल्हाधिकारी / तहसिलदार त्याहून वरिष्ठ पदाचे महसूल अधिकारी / अर्जदार व / वा त्याचे कुटुंब सामान्यतः ज्या क्षेत्रातील निवासी आहे त्या क्षेत्राचे उपविभागीय अधिकारी.
९. अन्य कोणतेही प्रमाणपत्र असल्यास.
पद क्र. २ करिता कागदपत्रे
उमेदवारांनी खालील स्व-प्रमाणित प्रती जमा कराव्यात.
१, जन्म प्रमाणपत्र (जन्म/ वय प्रमाणपत्राची झेरोक्स प्रत)
२. सर्व शैक्षणिक पात्रता प्रमाणपत्राची झेरोक्स प्रत (xerox)
३. जात प्रमाणपत्र (लागू असल्यास प्रमाणपत्राची झेरॉक्स प्रत) तसेच नविनतम ओबीसी प्रमाणपत्र (नॉनक्रीमीलेयर रकान्यासहित) व आर्थिक दृष्ट्या दुर्बल प्रवर्गातील उमेदवारांसाठी भारत सरकारने विहित केलेल्या नमुन्यात सक्षम अधिकाऱ्याने जारी केलेले जात प्रमाणपत्र.
४. अधिवास (निवास) प्रमाणपत्र/ जिल्हा रोजगार नोंदणीची झेरोक्स प्रत.
५. दोन वर्तमान पासपोर्ट आकाराचे रंगीत फोटो.
६. एम्प्लॉयमेंट एक्सचेंज नामांकन कार्ड.
७. लागू असल्यास PWD. चा पुरावा.
८. ओळख प्रमाणपत्राची झेरोक्स प्रत.
९. ना हरकत प्रमाणपत्र (NOR) आधीपासून कुठेही कामावर असल्यास
वयाची अट: 01 जानेवारी 2022 रोजी 18 ते 24 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
नोकरी ठिकाण: नाशिक
अर्ज पाठविण्याचा पत्ता: मुख्य व्यवस्थापक, मानव संसाधन विभाग, पंजाब नॅशनल बँक, दुसरा मजला, वुडलँड टॉवर, जुना गंगापूर नाका, गंगापूर रोड, नाशिक 422005
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 16 मार्च 2022
अधिकृत वेबसाईट – पाहा
मूळ जाहिरात
पद क्र.1: PDF पाहा
पद क्र.2: PDF पाहा