10 पास विध्यार्थ्यांना सुवर्णसंधी | मुंबई उच्च न्यायालय अंतर्गत भरती

Mumbai High Court Recruitment 2022मुंबई  उच्च न्यायालय आस्थापनेवर “वाहनचालक ” या पदाची एकून रिक्त जागा भरण्यासाठी इच्छुक व पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख : ११ एप्रिल २०२२ आहे.

एकून जागा : ८ 

पदाचे नाव : वाहनचालक 

पात्रता :

१. उमेदवार कमीत कमी एस.एस.सी (दहावी) किंवा तत्सम परीक्षा उत्तीर्ण असावा. 

२. उमेदवारास मराठी व हिंदी भाषा लिहिता, वाचता व बोलता येणे आवश्यक आहे.

३. जाहिरात प्रसिद्धीच्या तारखेस उमेदवाराचे वय किमान २१ वर्ष व कमाल ३८ वर्ष असावे. मागासवर्गीय उमेदवारांसाठी कमाल वयोमर्यादा ४३ वर्ष राहील. न्यायालयीन कर्मचारीकिंवा शासकीय कर्मचारी यांना वयाची अट नाही. उमेदवाराकडे जाहिरात प्रसिद्धीच्या दिनांकास व त्यानंतर मोटर वाहन अधिनियम १९८८ (क्र. ५९/१९८८) प्रमाणे वैध व कार्यरत असा किमान हलके मोटार वाहन (LMV) 

४.चालविण्याचा परवाना (ड्रायव्हींग लायसन्स) असावा.

५. उमेदवारास अर्ज करण्याच्या तारखेस किमान ३ वर्ष हलके किंवा जड मोटर वाहन चालवण्याचा अनुभव असावा..

६. उमेदवाराचा वाहन चालविण्याचा पूर्व कार्यकाल (रेकॉर्ड) स्वच्छ असावा.

७ उमेदवारास मोटर वाहनाची देखभाल व सर्वसाधारण दुरुस्तीचे ज्ञान असणे आवश्यक आहे.

८. उमेदवारास मुंबई शहराची स्वाभाविक रचना (Topography) माहित असावी.

९. उमेदवार शारीरिकदृष्ट्या सुदृढ आणि निर्व्यसनी असावा.

१०. चारचाकी वाहन चालविण्याचा आणि वाहनदुरूस्ती या दोन्हीचा अधिकतम अनुभव असणाऱ्या तसेच इंग्रजी भाषा किमान समजता व बोलता येणाऱ्या उमेदवारास प्राधान्य दिले जाईल.

नोकरीचे ठिकाण : मुंबई 

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन 

अर्ज करण्याची शेवटची तारीख : ११ एप्रिल  २०२२  

ऑनलाईन अर्ज करा : click here 

परीक्षा शुल्क  :   १००/- 

मूळ जाहिरात :  PDF

अधिक माहिती वाचा 

अर्ज कसा सादर करायचा ?

१. अर्ज सादर करतांना https://bombayhighcourt.nic.in या वेबसाईट ला भेट द्या. 

२. वरील सुचनांचे काटेकोरपणे पालन करूनच अर्ज सादर करावा. ऑनलाईन अर्ज जाहिरात प्रसिद्धिच्या दिनांकापासून १५ दिवसांत करावा. प्रस्तुत परीक्षेसाठी अर्ज फक्त ऑनलाईन पद्धतीने स्विकारण्यात येतील. इतर कोणत्याही प्रकाराने अर्ज स्विकारण्यात येणार नाहीत.

३. पात्र उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज https://bombayhighcourt.nic.in या वेबसाईटद्वारे दिनांक २८.०३.२०२२ ते दिनांक ११.०४.२०२२ पर्यंत सादर करणे आवश्यक आहे. ऑनलाईन अर्जाची लिंक दिनांक २८.०३.२०२२ रोजी सकाळी ११.०० वाजता उघडेल आणि दिनांक ११.०४.२०२२ रोजी संध्याकाळी ५.०० वाजता बंद होईल.

४. उमेदवारांनी संपूर्ण जाहिरातीचे वाचन करूनच अर्ज भरावा. संपूर्ण भरलेला अर्ज Submit केल्यानंतर त्या अर्जाची Printout काढावी. Printout वर दिलेल्या जागेवर स्वतःचा अर्ज भरतांना Upload केलेला फोटो चिटकवावा आणि विहित जागेवर काळया पेनाने स्वाक्षरी करावी. सदरील अर्ज उमेदवाराने स्वतःजवळ जतन करून ठेवावा. सदरील अर्ज आणि शैक्षणिक कागदपत्रे या कार्यालयात •पोष्टाने पाठवू नये. मात्र निवड प्रक्रियेदरम्यान दिलेल्या सूचनेनुसार आवश्यक त्या-त्यावेळी सदरील अर्जाची प्रत उपलब्ध करावी.

5.ऑनलाईन पद्धतीने अर्ज करताना उमेदवाराने स्वतःचा अद्यावत पासपोर्ट साईज चा फोटो (३.५ सें.मी x ४.५ से.मी) व स्वतःची स्वाक्षरी (३ सें. मी x २.५ से.मी) स्कॅन करून ४० KB पेक्षा जास्त साईज होणार नाही अशा पद्धतीने दोन स्वतंत्र फाईल्स jpg/jpeg format मध्ये करून ऑनलाईन अर्जात दर्शविलेल्या ठिकाणी सदर फोटो व स्वाक्षरी अपलोड करणे अनिवार्य आहे. (टिप फोटो व स्वाक्षरी अपलोड झाल्याची खात्री करावी). प्रवेशपत्रावर / अर्जावर दुसऱ्याचा फोटो / स्वाक्षरी असल्यास उमेदवारास निवडीच्या टप्प्यामध्ये प्रवेश दिला जाणार नाही

६.उमेदवाराने एकापेक्षा जास्त ऑनलाईन अर्ज सादर केल्यास त्याच्या/तिच्या फक्त शेवटच्या अर्जाचा विचार करण्यात येईल. 

७.उमेदवाराने http://bombayhighcourt.nic.in या वेबसाईट वर क्लिक करून Recruitment Staff Car driver च्या Apply Online वर क्लिक करावे तद्नंतर SBI Collect द्वारे ऑनलाईन फी भरावी तद्नंतर SBI Collect reference No. प्राप्त होईल तद्नंतर ७ ऑनलाईन फॉर्म भरावा.

८.उमेदवाराने आपली सर्व माहिती योग्यरित्या भरून झाल्यावर सर्वात शेवटी I Agree बटणावर क्लिक करून अर्ज प्रस्तुत (Submit) करावा

९. उमेदवाराने स्वतःच्या माहितीस्तव जो फॉर्म भरलेला आहे त्याची प्रत Print Application मध्ये जाऊन Registration ID No टाकून Print काढून स्वतःकडे जतन करून ठेवावी. 

१०. ऑनलाईन फॉर्म भरत असताना आपण जाहिरातीतील नमुद शैक्षणिक पात्रता / अनुभव / इतर बाबींची पूर्तता केली असेल तरच आपला अर्ज स्विकारला जाईल. 

११. परीक्षेच्यावेळी उमेदवाराने प्रवेश प्रमाणपत्र आणणे सक्तीचे आहे. त्याशिवाय परीक्षेस प्रवेश दिला जाणार नाही.

१२. उमेदवार शासकीय कर्मचारी असल्यास सक्षम प्राधिकाऱ्यांची (कार्यालयाची) मंजूरी घेतल्याचे ना-हरकत प्रमाणपत्र आवश्यक राहील.

Join whatsapp group – Click her

JOIN TELEGRAM PAGE  –   Click Here

मित्रांना शेअर करा:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top