आज आपण बेरोजगार भत्ता योजनेची संपूर्ण माहिती पाहणार आहोत.महाराष्ट्र राज्यातील बेरोजगार तरुणांना आर्थिक मदत मिळावी, यासाठी महाराष्ट्र बेरोजगारी भत्ता योजना राज्य सरकारने सुरू केले आहे.या योजनेंतर्गत राज्यातील सुशिक्षित बेरोजगार तरुणांना महाराष्ट्र शासनाने दरमहा ५००० रुपये बेरोजगार भत्ता महाराष्ट्र शासनातर्फे आर्थिक मदत दिली जात आहे. बेरोजगारी भत्ता योजना महाराष्ट्राच्या माध्यमातून राज्यातील तरुण स्वत: चे आणि आपल्या कुटुंबाचे पालनपोषण करू शकतील. या भत्यातून मिळणाऱ्या आर्थिक मदतीमुळे राज्यातील बेरोजगार तरुणांना दूरवरच्या नोकर्या शोधण्यातही मदत मिळणार आहे
बेरोजगारी भत्ता योजनेचे उद्दीष्ट –
महाराष्ट्र राज्यात असे बरेच तरुण आहेत, ज्यांना सुशिक्षित असूनही नोकरी नाही . सुशिक्षित असूनही रोजगार मिळू शकत नाही. या समस्या विचारात घेता, या सर्व बेरोजगार आहेत, त्या तरुणांसाठी महाराष्ट्र सरकारने बेरोजगारी भत्ता योजना महाराष्ट्र सुरू केली आहे. या योजनेंतर्गत राज्यातील सुशिक्षित बेरोजगार तरुणांना सरकार दरमहा बेरोजगार भत्ता देण्यात येणार आहे. तरुणांना रोजगार मिळत नाही तोपर्यंत हा बेकारी भत्ता देण्यात येणार आहे. बेरोजगार भत्ता यांच्यामार्फत बेरोजगार तरुणांना आर्थिक सहाय्य करणे. या योजनेच्या माध्यमातून बेरोजगार तरुणांच्या राहणीमानात बदल होईल. हा या योजनेचे मुख्य उद्दिष्ट्य आहे. या भात्यामार्फत मिळणाऱ्या पैशाचा उपयोग युवक त्यांच्या नियमित खर्चासाठी करतात.
बेरोजगार भत्ता योजना महाराष्ट्र लाभ –
कॉंग्रेस सरकारने दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांमधून लॅपटॉप व केजी ते पदवीपर्यंतचे विनाशुल्क शिक्षण देखील जाहीर केले आहे. तसेच कामगारांना किमान वेतन २१००० देण्याचे जाहीर केले आहे. या बेरोजगारी भत्ता योजनेअंतर्गत अर्जदारांनी किमान १२ वी उत्तीर्ण केलेली असणे आवश्यक आहे. या योजनेंतर्गत लाभ मिळवू इच्छित असलेल्या राज्यातील इच्छुक लाभार्थ्यांना या योजनेंतर्गत अर्ज करावा लागेल.या महाराष्ट्र बेरोजगारी भत्ता योजनेअंतर्गत प्रत्येक महिन्याला ५००० रुपये रक्कम थेट सरकार बेरोजगार तरुणांना बँक खात्यात जमा करणार आहे. त्यामुळे अर्जदाराचे बँक खाते असणे बंधनकारक असून बँक खाते आधार कार्डशी संलग्न असणे आवश्यक आहे
महाराष्ट्र बेरोजगार भत्ता योजनेची अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे-
- ओळखपत्र
- पत्ता पुरावा
- पासपोर्ट आकाराचा फोटो
- मोबाइल नंबर
- शैक्षणिक पात्रता प्रमाणपत्र (मार्कशीट)
- अर्जदाराचे आधार कार्ड
- वय प्रमाणपत्र
- उत्पन्न प्रमाणपत्र
बेरोजगार भत्ता योजना अटी-
- राज्यातील सर्व बेरोजगार तरुणांना या योजनेचा लाभ देण्यात येणार आहे.
- या योजनेंतर्गत महाराष्ट्र सरकार राज्यातील बेरोजगार तरुणांना दरमहा ५००० रुपयांची आर्थिक मदत करेल.
- या पैशाचा उपयोग युवक त्यांच्या दैनंदिन कामात त्यांच्या नियमित खर्चासाठी करतात.
- बेरोजगारी भत्ता योजना महाराष्ट्रात राज्यातील बेरोजगार तरुणांना तुम्हाला नोकरी मिळेपर्यंत बेरोजगारी भत्ता देण्यात येईल.
- या योजनेंतर्गत लाभ घेण्यासाठी अर्जदार किमान १२ वी पास असणे आवश्यक आहे.
- बेरोजगारी भत्ता निश्चित वेळेसाठी देय असणार आहे.
महाराष्ट्र बेरोजगारी भत्ता पात्रता-
- अर्जदार हा महाराष्ट्राचा कायम रहिवासी असावा.
- अर्जदाराचे कमीत कमी वय २१ आणि जास्तीत जास्त ३५ वर्षे असावे.
- या योजनेंतर्गत लाभ घेणाऱ्या अर्जदाराच्या कुटूंबाचे वार्षिक उत्पन्न तीन लाख रुपयांपेक्षा कमी असणे आवश्यजक आहे.
- अर्जदाराकडे उत्पन्नाचे कोणतेही स्त्रोत उपलब्ध नसावा, तरच लाभ घेता येईल.
- या योजनेअंतर्गत लाभ घेणारा अर्जदार सरकारी किंवा बिगर सरकारी नोकरी किंवा कोणत्याही व्यवसायाशी संबंधित असल्यास त्याला लाभ घेता येणार नाही.
- शैक्षणिक पदवी आणि कोणत्याही व्यावसायिक किंवा नोकरीभिमुख कोर्समध्ये पदवी नाही.