शैक्षणिक पात्रता :
- उमेदवार महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेत नोंदणीकृत असणे आवश्यक आहे. तसेच मान्यताप्राप्त विद्यापीठातून संबंधित विषयातील पदव्युत्तर पदविका (एम.डी. पदवी किंवा डी.एन.बी किंवा एम.एस.) असणे आवश्यक आहे.
- सर्व आवश्यक प्रमाणपत्रांच्या जसे की, शैक्षणिक (गुणपत्रिका व प्रमाणपत्रे), एम. एस. सी. आय. टी. उत्तीर्ण असल्याचे प्रमाणपत्र, मराठी विषय घेऊन एस.एस.सी. परीक्षा उत्तीर्ण, इत्यादीच्या प्रमाणित प्रती लिपी अर्जासोबत जोडणे आवश्यक आहे.
- अनुभव:- मान्यता प्राप्त वैद्यकीय महाविद्यालयातील (निवासी / रजिस्ट्रार / डेमॉन्स्ट्रेटर / टयूटर) म्हणून तीन वर्षांचा शिक्षक पदाचा अनुभव असावा. सदर नियुक्ती कंत्राटी तत्त्वावर एकावेळी चार महिन्यापेक्षा जास्त नाही, इतक्या कालावधीकरीता, प्रत्येक चार महिन्यानंतर एक दिवस सेवाखंड देऊन पुनर्नेमणूक अथवा महानगरपालिका वैद्यकीय निवड मंडळामार्फत (M.M.S.S. Board) अर्हताधारक उमेदवार उपलब्ध होईपर्यंत यापैकी जे अगोदर होईल अशा स्वरुपात करण्यांतयेईल.